करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात दोन कोल्ड कॅथनिट बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांना निवेदन देताना उपजिल्हा रुग्णालयाचे रूग्ण कल्याण समिती चे सदस्य फारुक जमादार यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, माजी नगरसेवक किरण बोकन, नरेंद्र ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते मुस्तकीन पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल पठाण, राजेंद्र वीर आदी जण उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोल्ड कॅथनिट बंद आहे. पोस्ट मार्टम साठी येणाऱ्या अज्ञात मृत तसेच अपघात झालेल्या मृत देहाला नातेवाईकांची ओळख पटे पर्यंत सद्यस्थितीत पोस्ट मार्टम रुम मध्ये किमान तीन दिवस ठेवावे लागते परंतु तीन दिवस मृत देह राहील्यास आजु बाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी चा त्रास होतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात दोन कोल्ड कॅथनिट बसवण्यात यावेत असे निवेदनात म्हटले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *