करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी जगप्रसिद्ध इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या जयंतीनिमित्त “इंग्रजी भाषा दिन” साजरा करण्यात आला. यानिमित्ताने इंग्रजी विभागाच्या वतीने डॉ. आनंद हिप्परकर, इंग्रजी विभाग प्रमुख, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांचे “शेक्सपियर फोरेवर” या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर

कार्यक्रम इंग्रजी विभाग यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा आणि दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्यातील सामंजस्य करारा अंतर्गत आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. आनंद हिप्परकर यांनी विल्यम शेक्सपियर यांचे इंग्रजी साहित्यातील त्रिकालबाधीत महत्त्व नमूद करून इंग्रजी भाषेतील त्यांचे योगदान यावर भाष्य केले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अभिमन्यू माने यांनी केले. व उपस्थितांचे आभार प्रा. सुधीर मुळीक यांनी मानले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. गौतम खरात यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *