करमाळा प्रतिनिधी

विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी शिवम राजेंद्र चिखले यांची 7 व्या खेलो इंडिया गेम्स साठी निवड झाली आहे.

मागील काही महिन्यापूर्वी 68 व्या राष्ट्रीय आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय धर्नुविद्या स्पर्धे 2024-25 स्पोर्टस अथॉरिटी ऑफ गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा संचलित धर्नुविद्या स्पर्धा या मरीदा (तालुका-नाडियाद जिल्हा-खेडा) या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगट मुले रिकर्व्ह या प्रकारात शिवमचा महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक प्राप्त करून देण्यात सिंहाचा वाटा होता. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे व गुणांकनच्या आधारावरती शिवमची भागलपुर बिहार येथे होणाऱ्या 7 व्या खेलो इंडिया गेम्स 2025 साठी निवड झाली. ही स्पर्धा दिनांक 04 मे ते 07 मे रोजी पार पडणार आहेत.

या यशस्वी खेळाडूला महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रा.रामकुमार काळे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे विद्या विकास मंडळ सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी शिवमच्या या यशाबद्दल अभिनंदन करून खेलो इंडिया स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *