करमाळा प्रतिनिधी
देवीचामाळ ता. करमाळा येथील शामल दिगंबरराव बागल या पतसंस्थेत साडेतीन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून गोरगरीब ठेवीदारांची पैसे देण्यास गेली दोन वर्षांपासून टाळाटाळ केली जात आहे. या सर्व ठेवीदारांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची भेट घेतल्यानंतर चिवटे यांनी तात्काळ जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्याशी संपर्क साधून या पतसंस्थेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी या पतसंस्थेच्या चौकशीसाठी स्पेशल ऑडिटर नेमून पंधरा दिवसात संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करू अशी आश्वासन दिले.
या पतसंस्थेचे चेअरमन मेगा प्रभाकर फलफले, व्हाईस चेअरमन रेणुका सिद्धेश्वर सोरटे, संचालक शारदा नारायण मोरे, कोयना शंकर फलफले, सुजाता श्याम पुराणिक, आशा हेमंत बिडवे, सुवर्णा रामचंद्र पुराणिक, उज्वला सुनील फुलारी, सुनिता दादासाहेब फलफले, सारिका बाळू लांडगे, नंदा रंगनाथ कोळेकर या 11 संचालकांनी संगणमताने साडेतीन कोटी रुपयांचा आर्थिक गैर व्यवहार केला आहे. हा गैर व्यवहार करण्यासाठी व्यवस्थापक अभिमन्यू महादेव गंदे, सचिव सुनील गजानन पुराणिक यांनी खोटी कागदपत्रे बनवली आहेत. गेली दोन वर्षापासून या संस्थेची संचालक ठेवीदारांना उलट सुलट उत्तर देत आहेत. सहाय्यक निबंधक कार्यालयात केवळ तक्रारी दाखल करून चौकशी करून तपास करू अशी उत्तरे दिली जात आहेत. यामुळे करमाळा सहाय्यक निबंधक कार्यालय सुद्धा शंकेच्या फेरीत अडकली होती. या पतसंस्थेचे करमाळा अर्बन बँकेमध्ये जवळपास 50 लाख रुपयांचे ठेवी असून ह्या ठेवी संदर्भात सुद्धा जिल्हाप्रमुख चिवटे यांनी या ठेवी परत घेऊन ठेवीदारांना समप्रमाणात वाटप करण्याचे सांगितले.
……………………….
शामल दिगंबरराव बागल पतसंस्थेचे करमाळा अर्बन बँकेमध्ये असलेल्या ठेवी तात्काळ परत देण्यासाठी प्रशासकीय संचालक तयार असून जिल्हा उपनिबंधकाचे आदेश येतात ही रक्कम परत देऊ : कन्हैयालाल देवी माजी चेअरमन अर्बन बँक
……………………….
शामल बागल पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संचालक मंडळांनी ठेविदाराचे सर्व पैसे परत द्यावेत. ठेविदार अत्यंत गोरगरीब आहेत. संवेदनशील वृत्तीने संचालक मंडळांनी निर्णय घ्यावा अन्यथा ठेवीदारांची पैसे मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल : महेश चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर