करमाळा प्रतिनिधी

मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी दि. बारामती सहकारी बँकेच्या करमाळा शाखेचा ग्राहक आभार मेळावा आयोजित केलेला होता. या ग्राहक आभार मेळाव्यासाठी बँकेचे संचालक देवेंद्र रामचंद्र शिर्के, संचालक किशोर शंकर मेहता तसेच विलासराव घुमरे सर, उद्धवराव सरडे, गणेश चिवटे, शहाजी राजेभोसले, ऍड. बाळासाहेब शिंदे, विजय पवार, विक्रांत मंडलेचा, काकासाहेब सरडे आदिजण व बँकेचे अनेक सभासद, खातेदार, हितचिंतक उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमासाठी वरील मान्यवर, सभासद, खातेदार, हितचिंतक त्यांचा बहुमुल्य वेळ देवून उपस्थित राहिलेबाबत बँकेने सर्वांचे मनपुर्वक आभार मानले. दि. बारामती सहकारी बँकेची करमाळा शाखा १५ ऑगस्ट २००० रोजी करमाळकरांचे सेवेत रूजु झाली. याला यावर्षी २५ वर्ष पुर्ण होत आहेत. आपण सर्वानी बँकेस भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे दिनांक ३१ मार्च २०२५ राजी संपलेल्या आर्थिक वर्षात बॅंकेच्या करमाळा शाखेच्या ठेवी रू. ६८.२३ कोटी झालेल्या असून कर्जवाटप रू.५४.५९ कोटी झालेले आहे. याच वेळी बारामती सहकारी बँकेच्या एकूण ठेवी रू. २१९४.८८ कोटी व कर्जवाटप रू.१३४९.२८ कोटी इतके झालेले आहे. याच वर्षाअखेर बँकेस विक्रमी असा रू. ७१ कोटीचा ढोबळ नफा व सर्व तरतुदी पुर्ण करून रू.११.४४ कोटी निव्वळ नफा मिळाला आहे. यावर्षी करमाळा शाखेस रु. ५०.३१ लाख निव्वळ नफा मिळाला आहे. राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनेत्रावहीनी पवार तसेच बँकेचे चेअरमन सचिनशेठ सातव, उपाध्यक्ष विजयराव गालिंदे तसेच सर्व संचालक मंडळाच्या सक्रीय प्रयत्नाने व त्याला सर्व सेवक वर्गाने दिलेल्या प्रतिसादाने बँकेने यावर्षी अतिशय चांगली वसुली केली असुन बँकेचा एनपीए 0 टक्के झालेला आहे ही खुप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी आपण कर्जदारांनी आपली थकबाकी भरणा करून सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले. यापुढेही अशाच सहकार्याची आपण सर्वाकडून बँकेची अपेक्षा आहे.

बँकेने ठेवीदारांसाठी १२ महीने ते २४ महिनेपेक्षा कमी कालावधीचे ठेवीसाठी सर्वसामान्य ठेवीदार व संस्थांसाठी ८.२५ टक्के व जेष्ठ नागरिकांसाठी ८.७५ टक्के असे आकर्षक व्याजदर केलेले आहेत. तरी ठेवीदारांनी या संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त ठेव बँकेत ठेवावी.

तसेच बॅंकेमध्ये वैयक्तिक व व्यवसायीक कर्जदारांसाठी विविध कर्ज योजना आकर्षक व्याजदरामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये सोनेतारण कर्ज १० टक्के, वाहन कर्ज ९.५०, शैक्षणिक कर्ज ९ टक्के, गृहतारण कर्ज ९ टक्के, व्यवसायासाठी कॅशकेडीट कर्ज व टर्मलोन १२ टक्के इ.

बँकेने या पारंपारीक कर्ज योजनांसोबतच मागील वर्षीपासून व्यवसाय व उदयोगांसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजाला दिले जाणारे व्याज परतावा धोरणावर आधारीत कर्ज योजना चालु केलेली आहे. या योजनेतुन मागील १.५ वर्षात व्यवसायीकांना करमाळा शाखेतुन १० कोटी कर्जवाटप केलेले अहे. वॅकेने आता आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासोबतच ओबीसी समाजासाठी – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ या महामंडळामार्फत दिले जाणारे व्याज परतावा धोरणावर आधारीत कर्ज योजना चालु केलेल्या आहेत. तरी या समाजातील गरजु व्यवसायीकांनी या कर्जयोजनांचा लाभ घ्यावा.

या ठेव व कर्ज योजनांसोबतच बँक आपल्या खातेदारांना पुढीलप्रमाणे सर्व आधुनिक बँकींग सेवा देत आहे. लॉकर सुविधा, एसएमएस अलर्ट सुविधा, आरटीजीएस एनईएफटी सुविधा, एटीएम डेबीट कार्ड, युपीआय सेवा (फोनपे, गुगलपे इ.), व्यवसायीकांसाठी क्युआर कोड सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा. इ. स्टेटमेंट सुविधा. तरी खातेदारांनी बँक देत असलेल्या या आधुनिक बँकींग सेवांचा लाभ घ्यावा.

यावेळी विलासराव घुमरे सर, गणेश चिवटे, शहाजी राजेभोसले, ऍड. बाळासाहेब शिंदे, विजय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर बँकेचे संचालक देवेंद्र रामचंद्र शिर्के व किशोर शंकर मेहता यांनी सर्व खातेदारांशी संवाद साधून त्यांचे सूचना व अडचणीबाबत चर्चा केली. बॅंकींग सेवेवावत आपल्या काही सुचना असतील तर याचे स्वागत केले जाईल.

या कार्यक्रमाचे आयोजन बँकेच्या सोलापूर विभागाचे विभागीय अधिकारी चेतन चव्हाण, करमाळा शाखेचे शाखाधिकारी काकासाहेब कोरडे व सर्व कर्मचारी यांनी केले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *