
करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण येथील न्यु इरा पब्लिक स्कूलने त्यांच्या (पूर्व प्राथमिक) सिनिअर केजी वर्गातील 2024-25 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. बारकुंड, मुख्याध्यापक आनंद कसबे, विभागप्रमुख कोमल रोकडे, वर्ग शिक्षिका समीना फकीर, अन्नपूर्णा शिंदे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्याना गौरवण्यात आले.

न्यु इरा च्या पदवीधरांनी सुंदर दीक्षांत गाऊन परिधान करून उत्साहाने प्रमाणपत्रे स्वीकारली. शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
