करमाळा प्रतिनिधी

प्रतापराव जगताप यांना जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्षपदी निवड करावी या मागणीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुकाध्यक्ष यांनी शिफारस केली.

या पत्रात सांगितले आहे की, गत चार वर्षापासून करमाळा तालुका कॉंग्रेस आय ब्लॉक अध्यक्ष पदावर मी कार्यरत असून वेळोवेळी पक्षाच्या आदेशानुसार विविध विषयावरती मोर्चे, आंदोलने, केली असून आजपर्यंत करमाळा तालुक्यात कॉंग्रेस पक्षाच्या ४२ शाखा उभ्या करुन संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील गोर-गरीब व वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे वडील देशभक्त स्व.नामदेवराव जगताप यांनी सोलापूर जिल्हयात कॉंग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे उत्तम

काम केले होते. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात त्यांना ओळखणारा मोठा वर्ग आहे. तोच आदर्श मी माझ्या डोळयासमोर ठेवून सोलापूर जिल्हयात कॉग्रेस पक्षाला बळकटी देण्याचा माझा मानस असून पक्षसंघटन मजबूत करण्याकरिता पक्षाचे सर्वेसर्वा खा. राहूल गांधी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व मा. केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे विचार डोळयासमोर ठेवून मी पक्षहितासाठी काम करेल. तरी मला आपल्या सर्वांच्या आर्शिवादाने सोलापूर जिल्हा कॉंग्रेस आय च्या जिल्हाध्यक्ष पदी काम करण्याची संधी मिळावी ही विनंती असे या पत्रात सांगितले आहे.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व मा. केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याकडेही शिफारस केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *