करमाळा प्रतिनिधी

आदिनाथ सहकारी साखर कारखाना मा.आ. संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती आदिनाथ बचाव पॅनलने प्रचारांमध्ये आघाडी घेतली आहे. सभासदांना विश्वास बसला शिंदेच कारखाना चालू शकतात अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण फुंदे यांनी दिली आहे.

माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे सारखे दूरदृष्टी असलेले नेतृत्व, साखर कारखानदारीचा दांडगा अनुभव, संपूर्ण जिल्ह्यामध्ये पारदर्शक कारभार करून उच्चांकी दर देणारे शिंदे बंधू यांचा नावलौकिक, महायुती सरकारशी असलेले संजयमामा शिंदे यांचे नातेसंबंध तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे  यांच्या सहकार्याने संजयमामा शिंदे हेच फक्त आदिनाथ साखर कारखाना सुरू करू शकतात याबद्दल सभासदांच्या मनामध्ये असलेली विश्वासार्हता, राजकीय गटातटाच्या पलीकडे जाऊन प्रचार सभांना सभासदांचा वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच बेछूट आरोपांची राळ विरोधकांकडून उडवली जात आहे.

विरोधकांनी प्रचारात अतिशय खालची पातळी गाठली असून आता संजयमामा शिंदे यांच्या प्रचारादरम्यान बोललेल्या क्लिप अर्धवट व मिक्स करून सभासदांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. परंतु विरोधकांचे हे सर्व मनसुबे सभासद उध्वस्त करणार असून येत्या 17 तारखेला माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल चांगल्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण फुंदे यांनी व्यक्त केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *