करमाळा प्रतिनिधी

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी टेल भागात मिळावे यासाठी घोटी गावचे लोकनियुक्त सरपंच विलास काका राऊत व निंभोरेचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र वळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सालसे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जोपर्यंत दहिगाव योजनेचे पाणी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको सुरूच ठेवणार, आम्ही उठणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे बंदोबस्ताखाली पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी राजगुरू, महसूल विभागाचे सर्कल वळेकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून येथून पुढे दहिगाव योजनेचे प्रत्येक आवर्तन हे टेल टू हेडच सुटेल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लेखी निवेदनामध्ये पाटबंधारे विभागाने म्हटले आहे की,आपले मागणीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून टेल भागास दि. १६/४/२०२५ रोजी सायंकाळ पर्यंत लाभ देणेची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच पुढील सिंचन आवर्तनापासून टेल टू हेड आवर्तन कार्यक्रम राबविण्यात येईल.

या रास्ता रोको प्रसंगी विलास काका राऊत, शिवाजी राऊत, प्रशांत शेंडे, बाळासाहेब राऊत, सतिश राऊत, धनाजी राऊत, दिनेश निकम, तानाजी ननवरे, आमोल भोसले, पाडुरंग राऊत, रामा राऊत, कांतीलाल राऊत, महेश राऊत, संजय राऊत, बाळासाहेब ननवरे, संभाजी म्हैत्रे, राहुल दुधे, गणेश बदर, हिराजी राऊत, किसन शिंदे, हनुमान मोलाणे, गणेश कदम, भारत राऊत, अमित निकम, भैरवनाथ जाधव, अक्षय खरात, अनिल ननवरे, रविंद्र वळेकर सरपंच, संतोष पाटील उपसरपंच, दत्ताभाऊ वळेकर, ईश्वर मस्के, धनु शिंदे, सोमा गुरव,सतीश पन्हाळकर, रणजित देवकर, मयूर पाटील आदी उपस्थित होते.

…………………….

लोकप्रतिनिधीच्या नियोजन शून्य कारभाराचा शेतकऱ्यांना फटका…

शेतकऱ्यांच्या रोशाला अधिकारी व कर्मचारी यांना सामोरे जावे लागत आहे. वैयक्तिक यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही. लोकप्रतिनिधीच्या अति हस्तक्षेपामुळे 24 गावांची वरदायीनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला असून त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांचे कोट्ट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे अशी संतप्त प्रतिक्रिया विलास काका राऊत यांनी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *