करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील अदिनाथ सह साखर कारखाना निवडणुकीत बागल गटाने निवडणूक न लढण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे त्याच पध्दतीने भविष्यातील राजकारणाचा विचार न करता महायुतीचा धर्म पाळून मा.आ.संजय मामा शिंदे यांना पाठींबा जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा या निवडणूकीत मा.आ.संजय मामा शिंदे व आ.नारायण आबा पाटील अशी लढत होत असताना निवडणूकीतून माघार घेतलेल्या बागल गटाच्या भूमिके बद्दल तालुक्यात तर्कवितर्क लढवले जात आहेत परंतु मा.आ.संजय मामा शिंदे हे महायुती मधील सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन त्यांना सन्मान जनक न्याय देवून निवडणुकीत सामोरे जात आहेत. रश्मी बागल या भाजपच्या पदाधिकारी आहे तसेच दिग्विजय बागल शिवसेना शिंदे यांचे विधानसभा उमेदवार होते. आज ही ते त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे बागल गटाची मा.आ.संजय मामा शिंदे यांना सोडून वेगळी भूमिका असण्याचं कारणच नाही आणि तो असा अविचार देखील करणार नाहीत स्व. दिगंबरराव बागल मामांनी तालुक्यातील विकासाच्या बाबतीत नेहमीच म्हत्वाची भूमिका पर पाडली आहे त्यांच्याच विचारां वरती आज बागल गट तालुक्यात काम करत आहे त्यामुळे आदिनाथ कारखाना पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचं आसेल तर मा.आ.संजय मामा शिंदे शिवाय पर्याय नाही हे त्यांना देखील ज्ञात आहे त्यामुळे  विकासाच्या दृष्टीने पायात पाय न घालता हातात हात घालून बागल घट काम करेल आसा मला विश्वास आहे सन २०२९ विधासभेच्या दृष्टीने बागल गटाला युतीधर्म पाळणं फायद्याचं ठरू शकते असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना आज भाजपचे मा.आ.राम सातपुते यांची चिखलठाण येथील सभेला भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दिदी बागल उपस्थित राहतील अशी मला खात्री आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *