करमाळा प्रतिनिधी
विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्याने ते आमदार नारायण आबा पाटील यांचेवर टिका करत असल्याचा घणाघात सावंत गटाचे नेते सुनील (बापू) सावंत यांनी केला. पोथरे येथील प्रचार सभेत ते बोलत होतै.
श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’ची पोथरे येथे प्रचार सभा पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रेवन झिंजाडे पाटील, राष्ट्रवादी तालूकाध्यक्ष संतोष वारे, सभापती अतूलभाऊ पाटील, जातेगाव सरपंच कगण ससाणे, बिभिषण खरात, तानाजी शिंदे, माजी सभापती किसनराव शिंदे, मात्री संचालक विठ्ठलराव शिंदे, तात्यासाहेब काळे, सुरेशभाऊ फुके, पोथरे सरपंच अंकुश शिंदे, जयदत् शिंदे, उपसरपंच बाबू जाधव, अधिकारनकर सर, दगडू झिंजाडे, छगन शिंदे, राजाभाऊ झिंजाडे, रावसाहेब पाटील, धनंजय काळे, बारीक जाधव, गोदाभाऊ झिंजाडे, संजय जाधव, उमेदवार देवानंद बागल, राहुल सावंत, डॉ. अमोल घाडगे, हरीदास केवारे, रविकिरण फुके, आदि उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सुनिल सावंत म्हणाले की, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या कष्टाचे मोल करण्यासाठी या पॅनलला निवडुन देणे गरजेचे आहे. आपल्याच तालूक्यातील कमी क्षेत्र उस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आदिनाथ बंद असल्याने बाहेरील कारखान्यास ऊस द्यावा लागला. परंतू या ऊसाचा मोबदला तर दुरच पण घातलेल्या ऊसाचे बील मिळावे म्हणुन शेतकऱ्यांना कित्येक वर्षे वाट पहावी लागली. आंदोलन करुन ऊस बीलाचा हफ्ता मिळावा म्हणुन रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. आदिनाथ सुरु झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काचा असणार आहे. यामुळे सभासद हि संस्था वाचवण्याची जबाबदारी घेतील व आमच्या पॅनलला मतदान करतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी प्रास्ताविक केले तर संतोष वारे, अतुलभाऊ पाटील, देवानंद बागल यांनीही विचार मांडले. सुत्रसंचलन डॉ. समाधान कोळेकर यांनी केले तर आभार सरपंच अंकुश शिंदे यांनी मानले.