करमाळा प्रतिनिधी

राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत करमाळा तालुक्यातील अन्नसुरक्षा योजने प्रतिक्षेत असलेल्या 190 विधवा, निराधार व 50 अपंग कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश करण्याची कार्यवाही तहसिलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी एस.एम.चव्हाण, पुरवठा निरीक्षक डि.व्हि.ढोबळे व पुरवठा अव्वल कारकून अनिल ठाकर यांनी केली आहे.

आज शनिवार दिनांक 12/04/2025 रोजी पात्र विधवा, निराधार, अपंग व ई-श्रम लाभार्थी यांना अमोलसिंह भोसले भूसंपादन अधिकारी जि.का.सोलापूर व तहसिलदार शिल्पाताई ठोकडे व पुरवठा निरीक्षण अधिकारी एस.एम.चव्हाण आणि पुरवठा निरीक्षक दिव्याश्री ढोबळे यांच्या हस्ते संबंधित लाभार्थीं यांना ई-शिधापत्रिका वितरण करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *