करमाळा प्रतिनिधी

अखिल भारतीय समता परिषद महिला आघाडी तालुका व शहर संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात महिलांना प्रमाणपत्र वाटप व कार्यकारिणी निवड सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजली श्रीवास्तव मॅडम होत्या. महिलांनी माता सावित्रीचा आदर्श घेऊन सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. असे मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय समता परिषद यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक गणेश (भाऊ) करे पाटील होते. माँ जिजाऊ यांचे संस्कार व महात्मा फुलेंचे सामाजिक कार्य यावर युवकांनी प्रेरित होणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण कसं जगलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. आरोग्य सल्लागार म्हणून डॉ. कविता कांबळे मॅडम यांनी महिलांच्या आरोग्याच्या समस्या याचे कसे निराकरण करायचे याबद्दल मार्गदर्शन केले.

डॉ.सोमनाथ बोराटे यांनी शासकीय व संस्थेमार्फत महिलांना वेगवेगळ्या योजना कशाप्रकारे मिळतात हे मार्गदर्शन केले. जगन्नाथ जाधव सर यांनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सोप्या भाषेत समजून सांगितला. स्वातीताई माने यांनी त्यांच्या कवितेतून व विचारातून महिलांना बळ देण्याचे काम केले. मोफत शिवण क्लास मध्ये भाग घेणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच तालुका व शहर कार्यकारिणी मधील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नवनाथ मोहोळकर सर, मधुकर शिंदे सर, सुरेखा जाधव मॅडम व रेणुका मोहोळकर इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता राऊत मॅडम यांनी केले. प्रस्ताविक अश्विनी जाधव-माने मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन शितल शिंदे मॅडम यांनी केले. समता परिषदेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *