करमाळा प्रतिनिधी

आज ग्रामपंचायत निंभोरे येथे लोकनियुक्त सरपंच रविंद्र वळेकर यांचे प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ समाजसुधारक आणि आद्य शिक्षक, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ संदीपान आप्पा वळेकर व हरिकाका कुलकर्णी यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य धनू वळेकर, आर.व्ही.ग्रुप चे अध्यक्ष इश्वर मस्के, रामभाऊ जाधव, बापू कन्हेरे, नितीन गायकवाड, दिलीप मुळे आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *