
करमाळा प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण व आदरांजली म्हणुन युवकांनी सामुहिक मुंडण करून संभाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी संग्रामसिंह परदेशी यांनी छत्रपती संभाजीमहाराज यांचा धगधगता इतिहास समोर मांडला. छत्रपती संभाजी महाराजांना कसबे संगमेश्वर येथे पकडले गेल्यापासून अतिक्रुर व पाशवी छळ करत वढु येथे नेण्यात आले.

या कालावधीत महाराजांचा रोज अमानवीय छळ करून रोजच्यारोज एक एक अवयव तोडुन फाल्गुन अमावस्या दिवशी धर्मांध औरंग्याकडुन महाराजांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. म्हणजेच श्री संभाजी महाराज मृत्युच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर पुर्ण महिनाभर रोजच्यारोज अति धीरोदत्तपणे देहत्याग करीत होते. त्यामुळेच संभाजीमहाराज यांचे बलिदान, त्यांनी सहन केलेल्या मरणयातना याची प्रत्येक हिंदुमनाला जाणीव होण्यासाठीच हा बलिदान मास आपण पाळणार आहोत असा श्री संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास उपस्थित लोकांसमोर मांडला. याप्रसंगी संग्राम दयाळ, युवराज सगर, किरण मोरे, महेश परदेशी, राधेश्याम देवी, डॉ. श्रीराम परदेशी, जितेंद्र सुरवसे, प्रियाल अग्रवाल, संजय भालेराव, आशिष चिवटे, ऋषिकेश शेळके, कुणाल माकुडे,नागेश गुरव, करण गुरव, अथर्व माने.इ. शिवशंभु पाईक उपस्थित होते.
