
करमाळा प्रतिनिधी
ग्रामपंचायत निमगाव ह येथील ग्रामपंचायतचे सरपंच पद जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण केले म्हणून अपात्र केले होते. या बाबतची तक्रार मकाई कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांनी केली होती यावर सरपंच लखन जगताप यांनी विभागीय अतिरिक्त आयुक्त पुणे यांचे कोर्टात अपील दाखल केले होते. सर्व कागदपत्राची पडताळणी केली असता व लेखी पुरावे पाहणी केले असता विरोधक नीळ यांनी केलेल्या तक्रारी या खोट्या ठरवून आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांचा दिलेला निर्णय रद्द ठरवून निमगाव येथील सरपंच पदाचे अपात्रता रद्द करून सदरचे पद हे कायम ठेवलेले आहे अशी माहिती सरपंच लखन जगताप यांनी बोलताना दिली.

……
यापूर्वीही माझे सरपंच पद घालवण्यासाठी अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या परंतु विरोधकांना कोणतेही यश प्राप्त झाले नाही. यापुढेही माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
……
यासंदर्भात तक्रारदार मकाईचे संचालक सतीश नीळ यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.