
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा जयकुमार गोरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. लोकप्रिय जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.

देशाचे कणखर नेतृत्व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वप्नातील भारत देश आणि महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे तळागळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुक्यात तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे यावेळी शहाजी यादव यांनी सांगितले.
