
करमाळा प्रतिनिधी
संत निरंकारी सत्संग भवन करमाळा येथे मकर संक्रांती निमित्त महिला सत्संगचे आयोजन करण्यात आले होते. समाजात मकरसंक्रांतीच्या सणाला विधवांना कुकंवाचा मान दिला जात नाही. त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. अवमानकारक प्रसंगही अनुभवावे लागतात. म्हणून संत निरंकारी महिला सत्संग सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रथमतः सर्व सौभाग्यवतीनी विधवांना सन्मानपूर्वक कुकंवाचा मान देवून गौरविण्यात आले. एकत्वाच्या संस्कारातून नारी शक्तीचे सक्षमीकरण करण्यासाठी आध्यात्मिक जागृती आवश्यक असते असे प्रतिपादन सुजाता ढवळे यांनी केले.

आज साधनाताई खताळ, रतन राऊत, मिनाक्षी थोरबोले, जगदेवी शिंदे यांना प्रथमतः कुंकुवाचा मान देवून हळदी कुंकुवाने सन्मानित करण्यात आले. तद्नंतर सर्व महिलांमध्ये हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे मंचसंचालन प्रफुल्लता थोरात यांनी केले. सर्वांचे आभार मानून समारोप करण्यात आला.
