करमाळा प्रतिनिधी

केम परिसरातील रस्ते, वीज, पाणी याबरोबरच‌ वडशिवणे तलावात उजनीचे कायमस्वरूपी पाणी सोडून या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या. असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी केले. करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा. रामदास झोळ सर यांच्या प्रचारार्थ केम ता.

करमाळा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आजिनाथ बापू परबत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे, आदिनाथ चे माजी संचालक माजी संचालक लालासाहेब जगताप, श्रीकांत साखरे पाटील, वाशिंबे

चे माजी सरपंच अनुरथ झोळ, भगवान डोंबाळे, राजुरी चे युवा नेते गजेंद्र भोसले, युवा नेते एकनाथ शिंदे, युवा नेते हनुमंत जगताप, गफूर शेख, आनंद भैया झोळ, प्रशांत बागल, युवराज तळेकर, चेतन साखरे, शामकुमार बोंगाळे, मनोज बोंगाळे, शिवाजी तळेकर, ज्योतीराम पारखे, राजेंद्र तळेकर, सागर पारखे, गणेश तळेकर, दीपक फरतडे, अतुल काळे, रोहित बोगाळे, धनाजी खरवडे, गौरव बोगाळे, ओम बोगाळे उपस्थित होते. सभेला संबोधित करताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, केम परिसरातील शेती वडशिवणे तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

या तलावातील पाण्यामुळे पूर्वीच्या काळी वडशिवने, कविटगाव, सांगवी, बिटरगाव इ. गावची जमीन केनॉल खाली बागायत होती व या तलावाचा फायदा सातोली, मलवडी, केम, पाथुर्डी इ. गावांना होत होता. परंतु तलावात बारमाही पाणी नसल्यामुळे त्याचा फटका या परिसरातील शेतीला बसलेला आहे. या तलावात कायमस्वरूपी उजनीचे पाणी यावे, ही या परिसरातील

शेतकऱ्यांची बरेच दिवसांची म्हणजेच उजनी धरण झाल्यापासून मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपण संधी दिल्यास लढा देऊन उजनीमध्ये बारमाही पाणी आणण्यासाठी काम करणार असल्याचे यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आपण लवकरच देवळाली येथे शैक्षणिक संकुल उभा करणार असुन व्यावसायिक शिक्षणाची सोय करून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. करमाळा व केम येथील एम.आय.डी.सी. मध्ये उद्योग आणुन येथील युवकांना हाताला काम मिळून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. महाराष्ट्रात कुंकू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले केमच्या कुंकू उद्योगवाढीकरता दळणवळणाचा प्रश्न, रस्त्याचा, पुलाचा प्रश्न मार्गी लावुन, बाजार पेठ मिळवून देऊन या उद्योगाला वैभव प्राप्त करून देणार आहे. करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्याबाबतही एक सर्व सुविधायुक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा, धनगर, ओबीसी, बहुजन समाजाला आपण शैक्षणिक समानतेच्या धोरणावर सवलती मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ निवडून द्या. अशी आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी करमाळा तालुक्यातील राजकारणाचा लेखा जोखा मांडत म्हणाले की, येथील पुढारी सोयीचे राजकारण करत असून, आपसात सत्तेची वाटणी करून आपल्या पुढील पिढीचे भवितव्य उज्वल करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांना तुमच्या मुला बाळाची चिंता नाही. पण त्यांना भीती आहे की, हे जर‌ शिकले तर आपल्या मागे कोण येणार ? त्यामुळे कै. नामदेवराव जगताप यांच्यानंतर एकही शैक्षणिक संस्था कुठल्या लोक प्रतिनिधीने उभी केली नाही. त्यामुळे आता गट तटाचे राजकारणात भावनिक बोलण्याला बळी पडू नका. ज्यांनी आपल्या तालुक्याचे वाटोळे केले त्यांना आता त्यांची जागा दाखवून करमाळा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती करण्यासाठी सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू प्रामाणिक नेतृत्व असणाऱ्या प्रा.रामदास झोळ सर यांना रिक्षा चे बटन दाबून विजयी करा. ही रिक्षा अडीअडचणीतुन बाहेर काढून शेतकरी कष्टकरी कामगार युवक महिला यांना न्याय मिळवून देऊन करमाळा तालुक्याचा विकास करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष आजिनाथ परबत यांची भाषणे झाली. केम येथील जाहीर सभेस शेतकरी, युवक, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *