आमदार संजयमामा शिंदे यांना सहकार्य करणार – मा. भाजपा नेते गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी
अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना या विधानसभा निवडणुकीत आम्ही सहकार्य करणार आहे अशी माहिती मा. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल, ता. अध्यक्ष अमोल पवार,अफसर जाधव,विनोद महानवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


पुढे बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, आमदार संजयमामा शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय आहेत महायुतीच्या सरकारच्या काळात त्यांनी पाठिंबा दिला होता तसेच त्यांची विचारसरणी व आमची विचारसरणी एक आहे. महायुतीच्या काळात खूप विकास कामे शिंदे यांनी केली आहे या सर्वांचा विचार करता व भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार शिंदे यांना पाठिंबा द्यायचे आम्ही ठरवले आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता करमाळा शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. तसेच विकी मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांच्या मेळावा घेण्यात येणार आहे. तरी सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गणेश चिवटे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *