करमाळा प्रतिनिधी
नारायण आबांच्या विकासात्मक धोरणामुळेच मी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन मकाई कारखान्याचे संचालक किरण कवडे यांनी केले. करमाळा विधानसभा मतदार संघाचा पश्चिम भाग हा आता सत्ता परिवर्तनासाठी महत्वाची भूमिका बजावत असून या भागातील मकाई कारखान्याचे संचालक किरण कवडे यांच्या प्रवेशाने नारायण आबा पाटील यांचा
जनाधार आता आणखी वाढला आहे. किरण कवडे यांनी आपल्या शेकडो समर्थकासह काल एका जाहीर सभेत नारायण आबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी संजय शिंदे व बागल गट सोडून मच्छिंद्र लकडे, शंकर लकडे, साहेबराव शिंदे, भारत शिंदे, शंभु कवडे यांचेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केले.
तर यावेळी व्यासपीठावर बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हा परिषद सदस्या सावितदेवी राजेंभोसले, युवानेते शंभूराजे जगताप, नवनाथ झोळ, प.स. सदस्य नागनाथ लकडे, संतोष वारे,माजी संचालक संतोष खाटमोडे पाटील, उदयसिंह मोरे पाटील, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, संजय गुटाळ, भास्करराव भांगे,रवीभाऊ कोकरे, विकास गलांडे, पंचम
राजेंभोसले, विलास कोकणे, देविदास साळुंखे, रामदास कोकाटे, माऊली भागडे, हनुमंत धायगुडे, दादा मोरे, काका पाटील, झंजूरणे सर, डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उमेदवार तथा माजी आमदार नारायण (आबा) पाटील म्हणाले की, मी 2014 ते 2019 या माझ्या आमदार पदाच्या कालावधीत पश्चिम भागास निधी आणि विकासकामं या बाबत
झुकते माप दिले. या भागातील पूल व रस्ते या बाबतीत अनेक वर्षे रखडलेले प्रश्न सोडवले. कोर्टी जिंती रस्ता, डिकसळ व केतूर पोमलवाडी पूल आणि इतर रस्ते ही कामे मार्गी लावली. उजनी काठच्या पुनर्वसित गावांना अठरा नागरी सुविधा मिळवून दिल्या. या भागातील विजेची टंचाई दूर केली. यामुळे अशा अनेक विकास कामांची दखल मतदारांनी घेतल्यानेच मला मिळणारा जनाधार वाढत गेला आहे. करमाळा मतदार संघातील मतदारानीही गावातील आपले राजकीय गट तट बाजूला ठेऊन विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन मतदान करावे. मी माझ्या कालावधीत दिसणारी ठळक कामे तुम्हाला सांगितली की, जी कामे आज पाच वर्षा नंतरही प्रत्यक्षात दिसून येतात. विद्यमान आमदारांनी भुलथापा मारणे सोडून एक तरी ठळक काम दाखवावे असे आव्हान माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. प्रास्तविक किरण कवडे यांनी केले. यावेळी नवनाथ झोळ, वहिनी, सुभाष आबा गुळवे, शंभूराजे जगताप यांची भाषणे झाली. सूत्र संचालन संजय फरतडे यांनी केले तर आभार नागनाथ लकडे यांनी मानले.