करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांची विचारधारा वेगळी व आमची विचारधारा वेगळी असल्यामुळे आम्ही आमदार शिंदे यांना सोडून माजी आमदार नारायण पाटील यांना समर्थन दिले असल्याची माहिती सावंत गटाचे नेते सुनील सावंत, राहुल सावंत, संजय सावंत यांनी दिली आहे.
आमदार शिंदे यांना करमाळा तालुक्यात कोणीही ओळखत नव्हते त्यावेळेस सावंत गटाचे नेते स्व.सुभाष अण्णा सावंत यांनी त्यांना खूप मोठे सहकार्य केले. आम्हीही त्यांना सहकार्य करून आमदारपदी विराजमान केले परंतु कोणालाही विचारात न घेता त्यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला. आमची विचारसरणी काँग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार,
शिवसेना उध्दव ठाकरे यांच्याशी जुळती आहे. तसेच करमाळा शहर असो या इतर ठिकाणी त्यांनी जो विकास निधी दिला आहे थोडाफार त्याचे काम अजून चालू झाले नाही, अनेक अडचणीचा सामना त्यासाठी करावा लागतो. उद्या सकाळी दहा वाजता नालबंद मंगल कार्यालय येथे सावंत गटाचा मेळावा आयोजित केला आहे. पाठिंबा माजी आमदार नारायण पाटील यांना
दिल्यामुळे यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सावंत गटातर्फे करण्यात आले आहे.