करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा करंजे-भालेवाडी येथील शाळेत माजी विद्यार्थी व गावातील होतकरू कार्यकर्ते यांच्या लोक सहभाग संकल्पनेतून संगणक कक्षाची निर्मिती रविवार, ३ नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात आली.
भाऊबीजेचे औचित्य साधून सकाळी ठीक ११.३० वाजता हभप नामदेव वासकर, साकतकर महाराज यांच्या हस्ते फीत कापून संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या स्वतंत्र दालनात दहा पैकी पाच संगणक संच स्थापित करून सुरवात करण्यात आली.
मुख्याध्यापक लक्ष्मण लष्कर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर एलबीआर कन्स्ट्रक्शनचे संचालक राजकुमार पवार, डॉ. रविकिरण पवार, पवार जनरल हॉस्पिटल, करमाळा, पुणे व्यापारी संघाचे महासचिव व इंटेरियर डेकोरेटर्स दत्ताभाऊ लक्ष्मण जाधव यांनी स्पर्धेच्या युगात संगणक ज्ञान विद्यार्थ्यांना असणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या मनोगतातून विशद केले.
हभप नामदेव महाराजांनी आपल्या मनोगतातून ‘ज्याची संगणकावर कमांड त्यालाच जगामध्ये डिमांड’ असे सांगून, प्रासंगिक विचार मांडले. डॉ. रविकिरण पवार यांनी अशा उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेसाठी संगणक उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवशक्ती इरिगेटर्स चे शिवाजी सरडे, राजकुमार पवार, डॉ. रविकिरण पवार, लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ईगल ग्रुपचे रामभाऊ पवार, प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. गोरख रोकडे यांचे वडील मच्छिंद्र रोकडे यांचा सन्मान करण्यात आला. पोपट डोलारे, एमरॉन बॅटरी इन्व्हर्टर, तसेच प्रिंटर उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. सरपंच काकासाहेब सरडे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गणेश सरडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण देण्याची जबाबदारी महात्मा गांधी विद्यालय करमाळा, येथील प्राध्यापक शरद जाधव यांनी घेतली. ई लर्निंग जगभरात किती मोठ्या प्रमाणात प्रगती करीत आहे याची माहिती दिली. शाळेत आणखी प्रशिक्षक उपलब्ध करून देईल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय रिझर्व बॅंकेचे पोपट डोलारे यांनी आपल्या विचारातून संगणकाची महती व स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यासिका असावी असे विचार मांडले. तसेच गावात अध्यात्म व सायन्स हातात हात घालून वाटचाल करीत आहे असे सांगितले व विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टर देण्याचे मान्य केले.
या कार्यक्रमासाठी सरपंच सुभाष सरडे, उपसरपंच पप्पू सरडे, पोपट (बापू) सरडे, गणेश घाडगे, नगर विकास विभाग, मंत्रालय, प्राध्यापक डॉ. तानाजी जाधव, गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करणे कामी शिक्षिका विद्या जाधव मॅडम, माजी विद्यार्थी मुकेश ठोसर, भिवा आरणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सहशिक्षक शिवलाल शिंदे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.