करमाळा प्रतिनिधी
दीपावलीचा पहिला दिवस हिंदू धर्मातील हा मोठा सण आहे. आजच वारंवार वीज जात आहे यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
देशात हिंदू धर्मानुसार दीपावली हा मोठा उत्सव आहे. या चार-पाच दिवसात नागरिक सकाळी उठून स्नान पुजा अर्चा करतात मोठा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात. याच दिवशी वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. करमाळा वीज
कर्मचाऱ्यांचा गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभार ताबडतोब थांबवावा. दीपावली सणात वीज खंडित करू नये अशी मागणी महिला व नागरिकांतून होत आहे.