करमाळा प्रतिनिधी

करमाळा-माढा मतदारसंघातील मनसेने अधिकृत उमेदवार दिलेला नाही त्यामुळेच होऊ घातलेल्या विधानसभेत कोणाचा प्रचार करायचा याचा निर्णय सर्व मनसैनिक व पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊनच भुमिका स्पष्ट करू असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी बोलताना सागितले.

आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करमाळा-माढा मतदारसंघातील उमेदवारी मिळावी म्हणुन सोलापूर येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात इच्छा व्यक्त केले होती.

तरी पक्षाच्या काही वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी येथे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असला तरी आपला मतदारसंघातील मनसेने पाच वर्षात बरेच लोकहिताचे कामे केले असुन पक्षाला व राज ठाकरे यांना मानणारा मतदार असुन ते सध्या तरी

संभ्रमात असल्याचे दिसुन येत आहे बरेच जागांचे फोन पण येत आहेत त्यामुळेच सर्व पदाधिकाऱ्यांसह मनसैनिक वरीष्ठ पदाधिकारी यांना विचारूनच भुमिका स्पष्ट करू व आपल्या विचाराचा व जनतेच्या व तालुक्यातील प्रश्नाची जाणीव असणारा उमेदवाराला निवडून येण्यासाठी प्रयत्न करू असे संजय घोलप यांनी सागितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *