
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील प्रमिलाबाई बलभीम जाधव (वय-७४) यांचे शनिवार दि. २६/१०/२४ रोजी सायंकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम जाधव यांच्या त्या अर्धांगिनी तर करमाळा न्यायालयातील वकील ॲड. प्रमोद जाधव यांच्या त्या मातोश्री होत.




