
करमाळा प्रतिनिधी
दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे, दारात रांगोळी, कंदील आणि पणत्यांची आरास ! हे आपण दरवर्षी करतोच.

अशाच प्रकारे सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सुध्दा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली दिवाळी साजरी केली.या मध्ये रंगीबेरंगी कागदी आकाश कंदील मुलांनी आपल्या वर्गशिक्षकांच्या मदतीने बनवले.तसेच

इको फ्रेंडली रंग वापरून अतिशय सुबक, सुंदर नक्षीकाम करून पणत्या रंगवल्या. सुंदर रांगोळी, रंगीबेरंगी पणत्या तसेच सुंदर आकाश कंदील यांनी वर्ग सुशोभित केले होते. सर्व विद्यार्थी सुंदर वेशभूषा करून दिवाळी साजरी करण्यासाठी स्कूल मध्ये आले होते.अतिशय आनंददायी वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली.यासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.


