
करमाळा प्रतिनिधी
मंगळवार दिनांक 22/10/2024 रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शेअर मार्केट, नीती आयोग, शेती विषयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार,

छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक विचार, रतनजी टाटा यांचे औद्योगिक क्षेत्रातील योगदान, भारतीय अर्थव्यवस्था अशा विविध विषयांवर माहितीपूर्ण भित्तीपत्रके तयार करण्यात आली. या भित्तिपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एल. बी.पाटील

यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ अंकुश करपे, डॉ. ज्ञानेश्वर सुपेकर, डॉ.अस्मिता सुपेकर, डॉ.अभिमन्यू माने, डॉ. विनायक खरटमल यांच्यासह सर्व प्राध्यापक,

कार्यालयीन कर्मचारी आणि अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदोदरी केकान यांनी केले तर आभार काजल गावडे यांनी मानले.

