करमाळा प्रतिनिधी           

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांचे आय.क्यू.ए.सी. व स्पर्धा परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

            सदर व्याख्यानामध्ये डॉ. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश, 5+3+3+4 चा पॅटर्न, पदवी स्तरावरील बदल, विषयाची निवड,  सत्र पद्धती यासह नवीन सर्व संकल्पना या विषयी PPT द्वारे सर्वांना सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास सर्व प्राध्यापकांसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अंकुश करपे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. कृष्णा कांबळे यांनी मानले

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *