
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटचे टोक असलेल्या कात्रज येथे आज विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कात्रज येथे सुमारे एक कोटी तीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला.करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेवटचे टोक असलेले कात्रज हे गाव उजनी बॅक वॉटर परिसरात वसलेले असून येथे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.यामुळे बारामती अग्रो साखर कारखान्याच्या

निमित्ताने सुभाष आबा गुळवे यांचा या भागातील लोकांशी कायमचा संपर्क असतो.मात्रअलीकडेच राजुरी येथे विविध विकास कामांचा व सबस्टेशन चा उद्घाटन सोहळा पार पडला .यावेळी राजुरी येथील लोकांनी कार्यक्रम पत्रिकेत सुभाष आबांचे नाव टाकले होते. मात्र सदर कार्यक्रमाला सुभाष आबा उपस्थित राहिले नव्हते. आज मात्र या कार्यक्रमास सुभाष गुळवे हे उपस्थित राहिले.सुभाष आबा गुळवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आमदार असलेल्या रोहित दादा पवार यांच्या मालकीच्या असलेल्या बारामती अग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. याशिवायबारामती अग्रो साखर कारखान्याच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद ही त्यांनी भूषविले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाने माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी घोषित केल्यापासून सुभाष आबा हे नारायण पाटील यांच्या बरोबरीने तालुक्यात फिरत आहेत. त्यामुळेसदर कार्यक्रमास सुभाष आबा उपस्थित राहिल्याने अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.