करमाळा प्रतिनिधी

विजयादशमीनिमित्त करमाळा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष पथसंचलन करण्यात आले. स्वयंसेवक संघामध्ये राष्ट्रीय विजयादशमी या उत्सवाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रथम शस्त्र पुजन करण्यात आले होते नंतर करमाळा शहरातील  किल्ला वेस येथुन सघोष पथसंचलनाची सुरुवात करण्यात आली. शहरातील किल्ला विभाग,बस स्थानक, सुभाष चौक,राशिन पेठ,जय महाराष्ट्र चौक, शिवाजी महाराज चौक,मेनरोड, वेताळ पेठ व पुन्हा किल्ला वेस येथे समाप्ती करण्यात आली.

शहरातील विविध भागातून सघोष पथसंचलन जात असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. अनेक ठिकाणी रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी केली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परमहंस नगर या भागाचे बौद्धिक प्रमुख अजेय गोटखिंडीकर, पुष्पा दिलीप गोटखिंडीकर, कराटे प्रशिक्षक नागनाथ बोळगे, प्रा. महेश निकत, संघचालक डॉ. श्रीराम परदेशी हे होते.  यावेळी कार्यक्रमास स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *