
सोलापूर दि.09 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य इतर मागासर्वीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य उपलब्ध करून देते.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत गुरव समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ तसेच नाभिक समाजाच्या विकासासाठी संत सेनाजी केशशिल्पी महामंडळ शासनाने स्थापन केलेली असून जिल्हा सोलापूर स्तरावरील कामकाज कार्यान्वित करण्यात आले आहे.

महामंडळाच्या कर्ज योजनांचे सन 2024-25 चे भौतिक व आर्थिक उद्दीष्टाबाबतची माहिती – योजना-बीज भांडवल- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग, भौतिक 20, आर्थिक 8.00, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ- भौतिक-3, आर्थिक 1.20. संत सेनाजी महामंडळ केशशिल्प महामंडळ भौतिक 3, आर्थिक 1.20, संत काशिबा गुरव युवा आर्थिक महामंडळ, भौतिक 3, आर्थिक 1.20.

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग, भौतिक 85, आर्थिक 97.75, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ- भौतिक-10, आर्थिक 11.50. संत सेनाजी महामंडळ केशशिल्प महामंडळ भौतिक 15, आर्थिक 17.25, संत काशिबा गुरव युवा आर्थिक महामंडळ, भौतिक 5, आर्थिक 5.75.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग, भौतिक 22, आर्थिक 13.20, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ- भौतिक 5, आर्थिक 3.00. संत सेनाजी महामंडळ केशशिल्प महामंडळ भौतिक 5, आर्थिक 3.00, संत काशिबा गुरव युवा आर्थिक महामंडळ, भौतिक 5, आर्थिक 3.00.
गट कर्ज व्याज परतावा योजना- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग, भौतिक 7, आर्थिक 39.80, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ- भौतिक- 1, आर्थिक 5.68. संत सेनाजी महामंडळ केशशिल्प महामंडळ भौतिक 1, आर्थिक 5.68, संत काशिबा गुरव युवा आर्थिक महामंडळ, भौतिक 1, आर्थिक 5.68.
महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज परतावा योजना- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग, भौतिक 106, आर्थिक 32.33, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ- भौतिक-0, आर्थिक 0.00. संत सेनाजी महामंडळ केशशिल्प महामंडळ भौतिक 0, आर्थिक 0.00, संत काशिबा गुरव युवा आर्थिक महामंडळ, भौतिक 0, आर्थिक 0.00.
थेट कर्ज योजना- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग, भौतिक 75, आर्थिक 75.00, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ- भौतिक-13, आर्थिक 13.00. संत सेनाजी महामंडळ केशशिल्प महामंडळ भौतिक 13, आर्थिक 13.00, संत काशिबा गुरव युवा आर्थिक महामंडळ, भौतिक 13, आर्थिक 13.00.
अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील वरील समाजातील नागरीकांनी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, सात रस्ता, सोलापूर पिन कोड-413003. दुरध्वनी क्रमांक 0217- 2312595 येथे संपर्क साधावा तसेच इतर मागास प्रवर्गामधील गरजू व्यक्तींनी वरील कर्ज योजनांसाठी ऑन लाईन कर्ज अर्ज ww.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेत स्थळावर दाखल करावेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आनंद मालुसरे यांनी केले आहे.