
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे करमाळा तालुक्यातील सर्वच विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या यांच्या मार्फत होणारे पीक कर्ज वाटप गेली ४ महिने पूर्णपणे बंद आहे. यामुळे उजनी धरण

११०% पूर्ण भरलेले असूनसुद्धा शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी खाजगी बँका, सावकार यांच्या कडून कर्ज घेत आहे. सध्या तालुक्यातील सोसायटी चेअरमन, संचालक यांची अवस्था कर्जवाटप बंद असल्याने फक्त नामधारी अशी झाली आहे.

विविध कार्यकारी सोसायटी मार्फत कर्ज वाटपा संबंधी प्रशासक कुंदन भोळे यांची भेट घेतली असता कोणताही ठोस निर्णय न घेता उडवाउडवीची उत्तरे देतात – डॉ.विजय रोकडे (चेअरमन वांगी विकास सोसायटी)
