करमाळा प्रतिनिधी

अनंत चतुर्दशी चा (जैन परंपरेमध्ये) निरंकार उपवास (फक्त संध्याकाळपर्यंत गरम पाणी) करून पारंपारिक प्रथेप्रमाणे हा उपवास ज्या परिवारामध्ये चार पिढी आहेत. तिथेच हा उपवास सोडला जातो. एकूण 90 ते 100 महिलांचा तेथे उपवास सोडण्यासाठी सहभाग होता. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच औरंगाबाद रहिवासी आमदार प्रशांत बंब यांनीही आवर्जून उपस्थिती लावली.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व सर्वांना निस्वार्थ सहकार्य करणारे असे राहता निवासी मदनलाल पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा या परिवाराने या उत्साहाचा लाभ घेतला व ममता राजेंद्र पिपाडा या करमाळा येथील कचरलालजी बलदोटा या परिवारातील सुकन्या आहे व त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपले नाव लौकिक केलेले आहे.

करमाळ्यामधील उपस्थित महिला आरती बलदोटा, सुनीता बलदोटा,  ज्योती मुथा, दीपा मंडलेचा, रचना लुंकड, कोमल सोळंकी, वैशाली गुगळे,सोनाली ललवाणी, मोनिका गरिया, सुवर्णा लुनीया,शामला कोठारी व इतर सर्व महिलांचा सन्मान व बहुमान करण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *