करमाळा प्रतिनिधी

रविवार शुभ आनंद सेवाभावी संस्था आयोजित, संस्थापक अध्यक्ष संतोषजी वारगड यांच्या संकल्पनेतून शेतकरी संवाद यात्रा रामवाडी, जिंती, कावळवाडी तसेच भिलारवाडी या ठिकाणी पोचली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तेथील पिकाची पाहणी

करून योग्य मार्गदर्शन झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केळी क्षेत्रातील उद्योजक म्हणून किरणजी डोके, आयसीएल कंपनीचे विभागीय विकास अधिकारी, सतीश माने, ॲग्री सर्च कंपनीचे डिव्हिजनल मॅनेजर राहुल पाटील, सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक दिलीप खांडेकर, फार्म प्रोडूसर कंपनी संचालक राऊत, प्रगतशील बागायतदार व सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते. या संवाद यात्रेमध्ये भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी पुढील संवाद यात्रेमध्ये सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *