जेऊर करमाळा

शेलगांव (क) येथील कार्यकर्त्यांनी माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या नेतृरवाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षात प्रवेश केला. जेऊर ता. करमाळा येथील माजी आमदार कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अनिकेत शिंदे, भूषण माने, अनिल माने, ग्रा.पं. सदस्य नितीन जगताप, दत्तात्रय (अण्णा) वीर, दीपक वीर, पांडुरंग गोरे,

युवराज वीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या सर्वांचे सत्कार माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती अतुलभाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पांडुरंग वीर, बाजार समिती संचालक बाळासाहेब पवार, माजी पंचायत समिती सदस्य जयराम सोरटे, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, विक्रम पवार आदी मान्यवर तसेच आनंद वीर, संदीप पाटील, अण्णा शिंदे, शरद शिंदे, हर्षवर्धन वीर, जगदीश वीर, माऊली काटूळे, सुनील सोनवणे, अजित शिंदे, महेश दास, प्रवीण जगताप, अक्षय वीर, फिसरे येथील राजाभाऊ पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी आता सर्वांनी या परिवर्तन लढ्यात सहभागी झाले पाहिजे. देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांचे नेतृत्वाखाली काम करत असताना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज, पाणी व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळवून देण्यासाठी आपण यापुढे अहोरात्र कार्यरत राहणार असून आज पर्यंत माझ्या तीस वर्षाच्या राजकीय जीवनात सर्वसामान्याची सेवा करून या तालुक्यातील लोकहिताचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावन्यास सर्व वेळ दिला. यापुढेही सत्तेचा वापर या तालुक्याच्या सर्वांगीन विकासाठी केला जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली जाणार असल्याने विराचे शेलगाव येथील कार्यकर्त्यांनी माझ्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास व पाठबळ देण्याचा घेतलेलेला निर्णय माझा उत्साह वाढवणारा असा आहे असेही माजी आमदार पाटील यांनी बोलून दाखवले. प्रास्ताविक विनोद गरड यांनी केले तर आभार राहुल गोडगे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *