करमाळा प्रतिनिधी

सार्वजनिक गणेशोत्सव 2024 करिता किल्ला विभाग येथील मानाचा तिसरा गणपती लोकमान्य टिळक तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी पत्रकार सागर गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी अनिकेत चोरगे यांची निवड करण्यात आली.

गणेशोत्सवा निमीत्त राष्ट्रसंत गाडगे बाबा समाज मंदीर येथे मंडळाची बैठक संपन्न झाली. त्यावेळी गायकवाड व चोरगे यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिव पदी गणेश शिंदे, खजिनदारपदी अभिजीत कारंडे,  कार्याध्यक्षपदी भोलेनाथ ननवरे तर मिरवणूक प्रमुख पदी वासुदेव ढोके यांचीही निवड यावेळी करण्यात आली. उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंडळातील सदस्यांच्या वतीने करण्यात आला. मंडळाच्या वतीने यावर्षीचा गणेशोत्सव थाटामाटात व भव्य स्वरूपात करण्यात येणार असून यानिमीत्त विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच लोकमान्य टिळक पुतळा परिसर ही सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच समाज प्रबोधनपर जिवंत देखावाही यावेळी सादर करण्यात येणार आहे.

                सदर बैठकीसाठी राहुल घुमरे, शिवाजी गायकवाड, विशाल गायकवाड, विरेंद्र लष्कर, सौरभ कदम, अभिजीत सुरवसे, अभिषेक शेलार, विनायक तोडकर, श्रीकांत पिंपळे, अविनाश मुसळे, कमलेश तोडकर, शुभम ननवरे, गौरव ननवरे, प्रणव जोशी, अनिकेत यादव यांचेसह आज माजी पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *