करमाळा प्रतिनिधी

खरेदी विक्री संघांचे चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवक नेते शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ३८ सेकंदात ४२७८ वृक्षलागवडीचा विश्वविक्रम आज करण्यात आला. यावेळी एकूण ४७०० झाडे लावण्यात आली.

शहरातील मौलाली नगर परिसरात महात्मा गांधी विद्यालयासह शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी या वृक्षलागवडीत सहभागी झाले होते.

यावेळी सहायक आयुक्त वीणा पवार, मुख्याधिकारी सचिन तपासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, वनाधिकारी नंदर्गे, अॅड. नवनाथ राखुंडे, संदीप सरडे, शुभम बोराडे, सोमा पठाडे, रेखा परदेशी, ज्योतीराम ढाणे, विक्रम ढाणे, ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या असाधे मॅडम, स्वराज अकॅडमी चे विद्यार्थी व शिक्षक तसेच अनिल सुरवसे भाऊसाहेब, इजराइल कुरेशी, रील स्टार दिक्षा शिंदे,साहिल मुलानी, आफताब मुलानी,रियाज सय्यद, रुपाली, आकाश सिंधी, राऊत, गुरू चव्हाण, अतुल देवकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *