
करमाळा प्रतिनिधी
लहानपणापासून नशिबात..सतत होता संघर्ष त्याच्या..
बिकट परिस्थिती पाचवीला पुजलेली..या वाघाच्या..
तरी न डगमगला तो..कठीण परिस्थितीत शिकत गेला..
प्रसंगी वृत्तपत्र अन पाव..वस्तूही ही विकत गेला..
असच पूर्ण झाल शिक्षण..आहे मेहनती स्वभावाचा..
सुधीर दादा गाडेकर..हा माणूसच जिवाभावाचा..||

कमी वयात कष्ट पाहून..तुटायच घरच्यांचं मन..
एक एक रुपया जमवून..केले बहिणीचेही शिक्षण..
आदर्श जिवा महाले अन..प्रेरणा संतसेना महाराज..
ऊर्जा नरवीर शिवबा काशीद..जिभेला तलवारीचा साज..
मनात शिवछत्रपती त्याच्या..गर्व त्या नावाचा..
सुधीर दादा गाडेकर..हा माणूसच जिवाभावाचा..||

मनात उर्मी समाजकार्याची..होती सामाजिक जाण..
संघटना बांधली युवकांची..जपला त्याने स्वाभिमान..
पदर खर्चाने मूर्ती वाटप..सांगितली महापुरुषाची कीर्ती..
साजरी करतो दरवर्षी..प्रत्येकाची जयंती, पुण्यतिथी..
कर्मभूमीत जरी कुर्डुवाडी..नातू माढा गावाचा..
सुधीर दादा गाडेकर..हा माणूसच जिवाभावाचा..||
सोन्यासारखा संसार आज..गोंडस अशी मुल गुणवान..
साथ पत्नीची भक्कम..असा पुढारी पुण्यवान..
राजकारण, समाजकारण सोबत..कुटुंबाप्रती दक्ष..
राष्ट्रीय नाभिक संघटनेचा..प्रदेश युवक अध्यक्ष..
सरचिटणीस भाजप युवा मोर्चा..गर्व हिंदुत्वाचा..
सुधीर दादा गाडेकर..हा माणूसच जिवाभावाचा..||
समाजासाठी मनात कायम..असते त्याच्या तळमळ..
राबवितो आदर्श उपक्रम..अन सामाजिक चळवळ..
अशीच भरारी घे दादा..हीच सगळ्यांची इच्छा..
तुझ्या राजकीय वाटचालीस..या कवितेतून शुभेच्छा..
निस्वार्थी व्यक्तिमत्व..ना हेवा रंक वा रावाचा..
सुधीर दादा गाडेकर..हा माणूसच जिवाभावाचा..||