
करमाळा प्रतिनिधी
कै. शुभदा वसंतराव पुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त साडे येथील विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले आहे.
यावेळी व्यासपीठावर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा विद्दालयाचे संचालक डॉ. वसंतराव पुंडे, डॉ. सुनीता दोशी, संचालिका निलिमा पुंडे, कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी, मुख्याध्यापक विकास माळवे, माजी उपसभापती

-गोकुळ पाटील, मा. सरपंच बापूराव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दोशी यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले तर निलिमा पुंडे यांनी सांगितले की, पंचवीस वर्षांपूर्वी कै. शुभदा पुंडे यांच्या सुचनेनुसार गोर गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप

करण्या संदर्भात डॉ. वसंतराव पुंडे यांनी पुढाकार घेतला त्यानुसार अजुनही दरवर्षी वह्या वाटप करीत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाडेकर सर यांनी केले तर प्रस्तावना आर. एन. शिंदे यांनी केली व आभार पाटील आर. बी. यांनी मानले. यावेळी असंख्य विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
