
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील नागरीक नगरपरिषद चा टॅक्स भरतात का ? भरत असतील तर मग सुविधा का मिळत नाहीत. सुविधा मिळत नाहीत तर मग टॅक्स चा पैसा जातो कुठे. करमाळाची अवस्था सध्या खुप बिकट होत चालली आहे. करमाळा शहराला

कोणी वालीच उरलेला नाही. सर्व मनमानी कारभार चालत आहे. काय रस्ते, काय गटारी, काय कचरा, काय गटारीच पाणी रस्त्यावर वाहतय, रस्त्यावर खड्डे च खड्डे, सर्वत्रच दुर्गंधी, दुर्गंधीत गहाण पिण्याचे पाणी, करमाळा बस स्थानक परिसरात

मोकाट जनावरे, कचरा कोठेच साफसफाई नाही नियोजन शुन्य कारभार त्यात काय कमी म्हणुन वहातूक कोंडी रस्त्यावर वेडीवाकडी लावलेली वहाने बेशिस्त वाहनचालक या सर्व गोष्टींचा त्रास हा शाळेत जाणार्या लहान लहान मुलांना, वयोवृद्ध

व्यक्तीना होत आहे. याकडे कधी लक्ष देऊन समस्यांवर उपाय करण्याचे काम नगरपरिषदेने करणे अपेक्षित असताना नगरपरिषद मात्र कायम निद्र अवस्थेतच पाहायला मिळत आहे. सध्या नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी कोण आहेत हे देखील 99% लोकंना माहीतच नाहीत हे विशेष.