
करमाळा प्रतिनिधी
घारगाव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे कल्याण होगले यांची तर व्हा. चेअरमन पदी अन्नपूर्णा शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते नूतन चेअरमन होगले व व्हा. चेअरमन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी घारगावचे माजी सरपंच रामलिंग

देशमुखे, बाळेवाडी सोसायटीचे चेअरमन वंदन नलवडे, कामोणेचे सरपंच रमेश खरात, विकास पाटील, लक्ष्मण पवार, बाळासाहेब खराडे यांचे सह सोसायटीचे सदस्य अंगद पवार, किरण पाटील, चंद्रकांत देशमुखे, संदीपान गायकवाड, बाळासाहेब हांडे, सतीश पवार, हाजी भाई तांबोळी, आसू केसकर, बिभिषन कात्रजकर, दत्तात्रय मस्तूद, दगडू गायकवाड आदी उपस्थित होते. शेवटी आभार सोसायटीचे सचिव आसिफ पठाण यांनी मानले.
