
करमाळा प्रतिनिधी
पोंधवडी ता.करमाळा येथील अमोल गाडे यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा श्री.मकाई सह. साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत बागल गटात जाहीर प्रवेश केला. वीट ता. करमाळा येथील कार्यकर्ता मेळावा प्रसंगी हा प्रवेश झाला. यावेळी गाडे यांनी बोलताना सांगितले की, भाजप प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिगंबरराव बागल, श्री.मकाई चे

मा.चेअरमन दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बागल गटामध्ये प्रवेश करत आहोत. रश्मी दिदि बागल यांना आमदार करण्यासाठी पोंधवडी परिसरातील सर्व कार्यकर्ते कटीबद्ध आहोत. यावेळी श्री.मकाई सह.साखर कारखाना चेअरमन दिनेश भांडवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे, सतीश नीळ, रेवन्नाथ निकत, गणेश झोळ, बापू चोरमले, संतोष पाटील, प्रवीण सरडे,

आशिष गायकवाड, अजित झांजूर्ने, रामभाऊ हाके, साधना खरात, आबा करगळ, काशीनाथ काकडे, माजी सरपंच दिगंबर गाडे, माजी सभापती मधुकर गाडे, बबन गणगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवा ढेरे, माजी सरपंच दिगंबर राऊत, दिलीप ढेरे, माजी उपसरपंच रवी ढेरे, जगन्नाथ जाधव, राजू गाडे, भाऊ गाडे, बाळासाहेब ढेरे, पांडुरंग जाधव,कांतीलाल चोपडे, दिलीप गाडे,रेवण ढेरे, शिवाजी गाडे, अशोक ढेरे विलास जाधव,आदी पदाधिकारी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
……………………..
करमाळा तालुक्यातील गावपातळीवरील अनेक प्रमुख कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती श्री.मकाईचे संचालक सतीश नीळ यांनी दिली आहे.स्व.दिगंबरराव बागल मामा यांच्या विचाराला मानणारे परंतु काही कारणाने दुरावलेले सर्व हितचिंतक रश्मी दीदी बागल, दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रिटेवाडी उपसा सिंचन योजना, एमआयडीसी, मांगी तलाव, केम वडशिवने उपसा सिंचन, सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन वाटप होणे, उजनी जलाशयावरील पूल, आरोग्य, रस्ते, वीज अशा विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी करमाळा तालुक्यातील मातब्बर मंडळी प्रवेश करणार आहेत. असेही सतीश नीळ यांनी सांगितले आहे.