करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील कानाड गल्ली भागामध्ये 2 ते ३ वर्षापूर्वी करमाळा नगरपरिषदेकडून नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली होती परंतु पाईपलाईन टाकल्यापासून कानाड गल्ली भागामध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागामध्ये नवीन पाईपलाईन असून सुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे
या ठिकाणी जुनी पाईपलाईन चालू करून नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करावा तसेच नवीन पाईपलाईन टाकलेल्या ठेकेदाराकडून हे काम पूर्ण करून घ्यावे व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. तसेच कानाड गल्ली येथील नागरिकांकडून पाणी पुरवठा बिल आकारू नये असे निवेदन मुख्याधिकारी करमाळा यांना माजी नगरसेविका राजश्री माने यांनी दिले आहे.