करमाळा प्रतिनिधी

दि. ०९/०६/२०२४ रोजी २२:०० वा. ते दि. १०/०६/२०२४ रोजी सकाळी ०४:०० वा. चे दरम्यान जगदंबा मोटार रिवायडिंग वर्कशॉप मौजे दिव्हेगव्हाण ता. करमाळा येथील दुकानाची लोखंडी शटर उचकटुन आतमध्ये प्रवेश करून सबमर्शिबल मोटारीचे कॉपर केबल बन्डल लहान कॉपर बन्डल, एकूण १,७७,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दामुन व लबाडीने घरफोडी चोरीकरून नेले म्हणून हरी बबन पाडुळे वय २६ वर्ष रा. दिव्हेगव्हाण ता. करमाळा यांनी अज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दिल्याने तो करमाळा पोलीस ठाणे गुरनं ३७८/२०२४ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण मागील काही महिन्यापासून पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये कॉपर वायरचे दुकानाचे शटर उचकटून कॉपर वायर व मोटार चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कॉपर वायर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गर्शनाने पोलीस ठाणेकडील तपास पथकास सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.

पोहेकॉ/१६४८ अजित उबाळे व त्यांचे पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणा आधारे माहिती मिळाली कि, तांब्याची तार चोरी करणारी टोळी ही बारामती, दौंड, औरंगाबाद येथील शहरामध्ये कॉपर वायरचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची टोळी कार्यरत असून ते गुन्हे करण्यासाठी सोलापूर जिल्हयात येत असे त्यावरून करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कंदर येथील ईश्वरी हॉटेल येथे थांबलो असता तेथे एक संशयित इसम आम्हांस पाठीवर सँग घेवून दिसला त्याचा संशय आलेने त्याचेकडे विचारपूस करता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने त्याचेजवळील सँग तपासून पाहता त्यात दोन स्कु-ड्रायव्हर, कटर, कटावणी वगैरे संशयित साहित्य मिळून आलेने त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्याने सांगितले की, त्याने त्याचे बारामती, दौंड, औरंगाबाद येथील साथीदार यांचेसह मिळून मागील काही महिन्यांपासून सोलापूर व इंदापूर, पुणे इत्यादी ठिकाणी साथीदारासह वाहनांमध्ये जावून कॉपर वायरचे दुकानाचे शटरचे कुलपे व शटर उचकटून दुकानातील दुकानातील कॉपर वायरचे केबल बन्डल व कॉपर वायर, इत्यादी साहित्याची चोरी केल्याचे सांगितले आहे. चोरी केलेला माल हा सोमनाथ शांतप्पा कोगनुर रा. शेवाळे प्लाट कुरकुंभ ता. दौंड या ठिकाणी यास दिल्याचे सांगितलेने त्यासही अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडून एकूण ४७२ किलो वजनाचे तांब्याची तार एकुण रू. ४,२४,८००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

अटक आरोपी नावे १) मिराज उर्फ सैफन शिवाजी काळे वय २५ वर्षे रा. वायरलेस फाटा दौड, ता. दौंड जि. पुणे २) त्रषीकेश शरद भोसले रा. कोऱ्हाळे बु. बारामती ३) सोमनाथ शांतप्पा कोगनुर रा. शेवाळे प्लाट कुरकुंभ ता. दौंड यांना दिनांक १७/०६/२०२४ रोजी अटक केली असून त्यांना दिनांक २१/०६/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर असून त्यांचेकडे तांत्रिक व कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांचेकडून खालील नमुद गुन्हे उघडकीस आले आहेत.

करमाळा पोलीस ठाणे ३७८/२०२४ भा.दं.वि. कलम ४५७,३८०, करमाळा पोलीस ठाणे ४०/ भा.दं.वि. कलम ४५७,४६१, ३८०, करमाळा पोलीस ठाणे ६८/२०२४ भा.दं.वि. कलम ४५७,३८०, करमाळा पोलीस ठाणे १४९/२०२४ भा.दं.वि. कलम ३७९

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीप सरदेशपांडे (मा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/१६४८ अजित उबाळे, पोना/११२ वैभव ठेंगल, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/१५५० तौफीक काझी, पोकॉ/११४३ सोमनाथ जगताप, पोकॉ/१७४८ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, पोकॉ/२१४२ गणेश शिंदे, पोकॉ/सौदागर ताकभाते तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोना/व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *