करमाळा प्रतिनिधी

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था करमाळा संचालित श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा या शाळेच्या आज शनिवार  दि १५/०६/२४ पहिल्या दिवशी इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व मुलींचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेलार मॅडम यांनी केले व औक्षण इ ५ वी च्या वर्गशिक्षिका तृप्ती थिगळे मॅडम यांनी केले.

     तसेच आज नविन आलेल्या पालकांचे स्वागत संस्थेचे संचालक मंडळ खुशालभाई देवी, गणेश भाऊ चिवटे, महेश परदेशी, शाम पुराणिक यांनी केले.

     क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन खुशालभाई देवी यांच्या हस्ते झाले व त्यानंतर इ ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थिनींना पुस्तक वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने आज प्रशालेमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थिनींच्या पालकांचे आभार मानण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *