
करमाळा प्रतिनिधी “
शाळा….या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय, याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते. शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम, मित्रांसोबत केलेली मस्ती, मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणे, तास चालू असताना केलेली बडबड, सगळ आठवत आता. शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा, शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात. 10 जुन ला शाळेचा पहिला दिवस, कुणी पहिल्यांदाच या नवीन विश्वात आज प्रवेश करेल तर कुणी मोठ्या सु्ट्टीनंतर आज पुन्हा शाळेत जाईल. अशाच पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या काही चिमुकल्यांचे फोटो व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होते.

संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष जयंत रामचंद्र दळवी व पालकांच्या हस्ते रिबीन कापून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. नंतर सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजन संस्थेच्या सचिव व शाळेच्या मुख्याध्यपिका धनश्री जयंत दळवी मॅडम यांनी केले. पहिला दिवस असतानाही विद्यार्थ्यांची संख्या भरपूर होती. शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचा आनंद भरपूर होता आणि शाळेत आल्यानंतर शाळेची सजावट पाहून विद्यार्थी अजून उत्साही झाले. त्यांचा उत्साह पाहून पालकही निश्चिंत झाले कि त्यांचा पाल्य येथे आनंदी राहील. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या सजावटी साठी शिक्षकांनी चार-पाच दिवस अगोदर येऊन तयारी चालू केली होती. त्यामुळे सजावट चांगल्या प्रकारे झाली.

उद्घाटनाच्या वेळी शाळेच्या सर्व पालकांनी उपस्थिती लावली. तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते.