
करमाळा प्रतिनिधी
महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक कापले सर नियत वयोमानानुसार दिनांक 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक पदी पर्यवेक्षक बी.के. पाटील सर यांची नियुक्ती करण्यात आली तर पर्यवेक्षक पदी सहशिक्षक आर.एम. भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक कापले सर यांचा संस्थेचे चेअरमन जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला तर नूतन मुख्याध्यापक पाटील सर व भोसले सर यांचाही संस्थेचे चेअरमन जयवंतराव जगताप यांनी सत्कार केला. कापले सर यांचे मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लाभणारच आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचे समाधानाचे समृद्धीचे व आरोग्याचे जावो तसेच पाटील सर व भोसले सर यांना खूप खूप शुभेच्छा विश्वस्त वैभवराजे जगताप, विश्वस्त शंभूराजे जगताप व उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिल्या आहेत.

