
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे उपाययोजना कराव्यात – अध्यक्ष संतोष वारे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे शासकीय यंत्रणेने ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी मागणी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे यांनी केली आहे.करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याचे पाण्याची अडचण निर्माण झाली आहे ग्रामीण भागातल्या

महिलांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून हांडे घेऊन भटकंती करावी लागत आहे. मुक्या जनावरांनाही पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. तरी शासकीय यंत्रणेने ताबडतोब आढावा बैठक घ्यावी व खेडोपाडी आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर व तसेच जनावरांना पिण्याचे पाण्याची सोय करावी अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे यांनी केली आहे
