करमाळा प्रतिनिधी

चालु वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने उजनी धरण अर्ध्यापेक्षा जास्त भरले नव्हते. त्यात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे उजनीच्या पाण्याने तळ गाठला आहे. मे महिना उलटून गेला तरी अद्याप समाधानकारक मान्सून पूर्व पाऊस

पडला नाही. उजनी पट्टयात उभी असलेली ऊस, केळी व इतर फळबागा पाण्याअभावी जळून जाण्याच्या स्थितीत आहेत. करमाळा शहरासह बऱ्याच शहरांना आठवडयातून एक-दोनदा  पाणी पुरवठा होत आहे विहीरी व बोअरवेल्स ची पाणी पातळी

घटली आहे. उजनी जलाशयाच्या वरील बाजूस असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणांमधून किमान १२ टीएमसी पाणी तात्काळ उजनी धरणात सोडण्यात यावे व शासनाने उजनीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी भाजपा जिल्हा

यूवा मोर्चा चे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी निवेदनाद्वारे जलसंपदामंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *